वैभववाडी तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचे घरोघरी उत्स्फूर्त स्वागत

वैभववाडी तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा मतदारांचा निर्धार

वैभववाडीतील मतदारांचे माझ्यावर विशेष प्रेम संदेश पारकर

वैभववाडी तालुक्यात संदेश पारकर यांचा झंझावती प्रचार दौरा सुरू असून, वेभववाडी तालुक्यातील गडमठ गावठण वाडी येथील गडमठ सरपंच मालती शेट्ये याच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, संजय हिरलेकर, विकास मटकर, नारायण दळवी, नागेश आडके, विराज कदम, चंद्रकांत कदम, दीपक कदम, संदेश कदम, अमित शेट्ये, अभिजीत रावराणे, सत्यजित रावराणे आणि गडमठ गावठाणवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावे गडमठ गावातून जास्तीत जास्त मतदान संदेश पारकर यांना करण्याचा निर्धार यावेळी गडमठ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

error: Content is protected !!