आमदार नितेश राणे यांनी घेतल कुणकेश्वराचे दर्शन

दिव्यांनी कुणकेश्वर मंदिरात लख्खं उजळलं

आमदार नितेश राणेंचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार

दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 15 हजार दिव्यांनी कुणकेश्वर परिसर दिव्यांच्या प्रकाशात नाहून निघाला होता. कुणकेश्वर मंदिरात दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती मंदिराच्या गाभाऱ्यात आणि पिंडी भोवती दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती दिव्यांमुळे कुणकेश्वर मंदिर लख्ख उजलुन निघाले होते. आमदार नितेश राणे यांनी कुणकेश्वराचे दर्शन घेतले यावेळी देवस्थानाचे नूतन अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या हस्ते आमदार नितेश यांच्या सत्कार केला.
यावेळी देवस्थानाचे नूतन अध्यक्ष एकनाथ तेली सरपंच महेश ताम्हणकर संदीप साटम बाळा खडपे दया पाटील आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!