कणकवली मतदार संघातील जनता माझ्यासोबत त्यांचा विश्वास सार्थ ठरवणार!

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना विश्वास
संदेश पारकर यांच्याकडून झंझावाती गाव दौरा
महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार संदेश पारकर यांनी गेले चार दिवस घरोघरी प्रचार फेरीवर भर दिला असून आज त्यांनी कणकवली तालुक्यातील बोर्डवे गावाचा झंझावती दौरा केला. यावेळी संदेश पारकर यांना ग्रामस्थांनी आपलेपणाने तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहोत अशी ग्वाही दिल्याची माहिती पारकर यांनी दिली. बोर्डवे गाव दौऱ्याला संदेश पारकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर जनता माझ्या सोबतच आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे व तो सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी या प्रचार केल्यानंतर दिली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, रीमेश चव्हाण यांच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




