शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत वैभव नाईक, राजन तेली यांना स्थान

कणकवली विधानसभेसाठी नाव अद्याप जाहीर नाही

कणकवली विधानसभेसाठी संदेश पारकर यांचे नाव आहे आघाडीवर

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या रणधुमाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना ठाकरेगटा कडून सिंधुदुर्गातील तीन पैकी दोन मतदारसंघातील उमेदवारांना ठाकरे गटाने पहील्या यादीत स्थान दिले आहे. यामध्ये सावंतवाडी मतदारसंघासाठी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून राजन तेली तर कुडाळ मतदार संघात अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार वैभव नाईक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघांना व्यतिरिक्त राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात तीन पैकी उमेदवार कोण असणार ते पक्षाकडून गलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये सद्यस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची दावेदारी मानली जात असतात युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व विधानसभा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे हे देखील या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या तिघांपैकी संदेश पारकर यांचे नाव सध्या स्थितीत आघाडीवर आहे. नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर यांची लढत होईल अशी कार्यकर्त्यांकडून अटकळ बांधली जात आहे. मात्र जर संदेश पारकर यांचे नाव अंतिम झाले असेल तर ते जाहीर करण्यापासून पक्ष उशीर का करतो? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. संदेश पारकर यांनी उमेदवारीच्या दृष्टीने तयारी केली असून शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनीही शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता कणकवली मतदारसंघात उमेदवार कोण? त्याकडे अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!