वैभववाडी ठाकरे गट शहरप्रमुख सिध्देश रावराणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी येथे पार पडला पक्षप्रवेश

  वैभववाडी शहरातील ठाकरे युवा सेनेचे शहर प्रमुख सिद्धेश रावराणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या सभागृहात हा प्रवेश पार पडला. आमदार नितेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात जंगी स्वागत केले. पक्ष प्रवेशाची मालिकाच गेली अनेक दिवस सुरू असल्याने वैभववाडी तालुक्यात शिवसेना अधिकच खिळखिळी बनली आहे.
    सिद्धेश रावराणे यांच्यासोबत महेश परब, ओमकार मेस्त्री, सचिन करकोटे, श्रेयस रावराणे, सतेज गुरव, केतन सावंत, चित्रसेन होळकर, दत्तात्रय साळवी, सागर अडुळकर, गंगाराम अडुळकर, वैभव परब यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
 वैभववाडी शहर विकासासाठी आमदार नितेश राणे यांनी कोट्यावधीचा निधी दिला आहे. आमदार नितेश राणे यांच्यामुळे अनेक विधायक कामे मार्गी लागली आहेत. खऱ्या अर्थाने वैभववाडीच्या वैभवात आमदार नितेश राणे यांच्यामुळे भर पडली आहे. यापुढे देखील आमदार नितेश राणे हेच विकास करू शकतात. असा विश्वास प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!