कणकवलीतील विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून कार्यकारणीला मान्यता
सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल बाळू मेस्त्री यांचे केले जातेय अभिनंदन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या कमिटी कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कार्यकारणीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्यता दिली आहे.यामध्ये कणकवली तालुक्यातील जुने काँग्रेसचे कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री यांची सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष बाळू मेस्त्री हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत असून त्यांना मिळालेल्या या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली