केदार भाऊंच्या सत्कार सोहळ्याला शिवडाव ग्रामस्थ भावूक.

ग्रामविकास अधिकारी म्हणून शिवडाव गावात साडे सात वर्षे होते कार्यरत/संभाजीनगर येथे झाली प्रशासकीय बदली.

कर्तव्यदक्ष आणि विकसनशील “प्रशासकीय सेवादूत” अशी निर्माण केली ओळख.

कणकवली/मयूर ठाकूर.

कणकवली तालुक्यातील शिवडाव गावात गेली साडे सात वर्षे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले श्री.सुरेश पांडुरंग केदार यांची बदली त्यांच्या मुळ गावी संभाजीनगर येथे झाली.नम्र स्वभावाने गावच्या प्रत्येक कुटुंबाचा भाग झालेल्या केदार भाऊंचा सत्कार तसेच निरोप समारंभ नुकताच शिवडाव येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झाला.या सन्मान सोहळ्याला असंख्य ग्रामस्थ उपास्थित होते.प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य केलेल्या कामाची पोच जणू या कार्यक्रमातून ग्रामस्थान्नी दिली.अनेक प्रतिष्टीतांनी या कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आणि केदार भाऊ यांच्याप्रती असलेले प्रेम,सदभावना व्यक्त केली.प्रसंगी अनेक जण भावुक देखील झाले.असा प्रशासकीय अधिकारी पहिल्यांदा गावाला लाभला अश्या भावना यावेळी ग्रामस्थान्नी व्यक्त केल्या.
सुरेश केदार यांचा स्वभाव हा अत्यंत नम्र आहे.गेल्या काही वर्षांत झालेल्या गावच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अनेकांना त्यांच सहकार्य कायम राहिलेले असून गावच्या प्रत्येक कुटुंबात त्यांनी जणू एक मोठा हिस्सा निर्माण केला आहे.त्यांच्या कार्याचे ऋण लक्षात घेता ग्रामपंचायत कार्यालय शिवडाव यांसकडून भव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी अनेकांनी भाऊंचे वैयक्तिक सत्कार देखील केले.
अनेक गावांत प्रशासकीय सेवा दिली परंतु शिवडाव गावात सेवा देत असताना खरा आनंद मिळाला.यापुढील काळात असा अनुभव येणे शक्य नाही.आपण दिलेल्या या भरगोस प्रेमासाठी मी कायम ऋणी राहीन.अश्या भावना यावेळी केदार भाऊंनी व्यक्त केल्या.
या कार्यक्रमादरम्यान गावात साडे सहा वर्षे पोलीस पाटील म्हणून सेवा दिल्याबद्दल दारिस्ते गावचे पोलीस पाटील हेमंत सावंत यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला गावचे सरपंच, तसेच सर्व ग्राम्यांचायत सदस्य,ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!