भिरवंडे मध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपा उपाध्यक्ष गोटया सावतांचा धक्का

अनेक ग्रामस्थांनी केला भाजपामध्ये प्रवेश
प्रवेश कर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, गोट्या सावंत!
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांना भिरवंडे गावात जोरदार धक्का दिला आहे . भिरवंडे गावचे माजी सरपंच फ्रांसिस उर्फ बाबन लोबो, माजी ग्रा प सदस्या मॅक्सीमीला वॉज ,, जोसेफ वॉज , विल्यम लोबो, वेलांटीन वॉज फ्रानसिस वॉज, आंतोन डिसोजा, तसेच बचत गटाच्या महिला सिंड्रेला लोबो, मारी डिसोजा, अँजेलिन वॉज, रोपीना लोबो, एस्टीलीन डिसोजा, आयरीन फर्नांडिस, रोजारीण लोबो आदी भिरवंडे परतकामवाडी येथील महिलांनी संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आम नितेश राणे व माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या सामाजिक व विकास कामांच्या कार्याने प्रेरित होऊन तसेच ग्रामस्थांना दिलेला शब्द ते पूर्णपणे पाळतात म्हणून आपण भाजप मध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले. तर संदेश उर्फ गोटया सावंत यांनी प्रवेशकर्त्यांना तुमच्या कायम पाठीशी राहणार असून तुमच्या विकासकामांना निधी उपलब्ध करून देणार असून व्यवसाय करणाऱ्या बचत गटाच्या महिलांना व्यवसायासाठी सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत सुनील सावंत, आशिष सावंत आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली