न्यू इंग्लिश स्कूल येथे वाचन प्रेरणा दिन साजरा

आचरा–अर्जुन बापर्डेकर
धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेत वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मी वाचलेले तुम्ही वाचा या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकाचा परिचय करून दिला. त्यानंतर समूहवाचन घेण्यात आले यावेळी प्रशालेतील शिक्षक साठे लकर यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे कार्य व वाचनाचे महत्त्व विशद केले . मुख्याध्यापक गोपाळ परब यांनी वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे वाचनाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ कदम यांनी केले .या प्रदर्शनास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलिमा सावंत सदस्य राजन पांगे अर्जुन बापर्डेकर संजय पाटील यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.




