माजी आमदार राजन तेली उद्या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

सावंतवाडी मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय धुमशचक्री

सावंतवाडी मतदारसंघात तेली विरुद्ध केसरकर लढती कडे राज्याचे लक्ष लागणार

उद्धव ठाकरे यांच्याशी राजन तेलींची आहेत निकटचे संबंध

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे असून जिल्ह्यातील सावंतवाडी मतदार संघ हा सध्या राजकीय भूकंपाचे केंद्रबिंदू बनला आहे. या भूकंपाचे धक्के गेले काही दिवस माजी आमदार राजन तेली यांच्याकडून देणे सुरू असताना भाजपचे या ठिकाणी इच्छुक असलेले उमेदवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळचे संबंध असलेले माजी आमदार राजन तेली उद्या उद्या सायंकाळी चार वाजता मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून, गेले काही दिवस राजन तेलीही शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र उद्या या चर्चेला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. या घडामोडीमुळे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी होणार असून दीपक केसरकर यांना सावंतवाडी मध्ये होणारा विरोध व त्या ठिकाणी इच्छुक असणारे विशाल परब यांच्यामुळे या ठिकाणी लढत रंगतदार होणार असल्याची शक्यता आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये अर्चना घारे परब यादेखील या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार की राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार व यातून मैत्रीपूर्ण लढत होणार की राज्यातील संभाव्य होणारी महाविकास आघाडीतील युती सावंतवाडी तुटणार ते देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे. राजन केली यांनी काही दिवसांपूर्वी सावंतवाडी घेतलेला मेळावा हा भविष्यातील त्यांच्या राजकीय वाटचालीची संकेत देणारा ठरला होता. आणि गेल्या 40 वर्षांचा राजकीय प्रदीर्घ अनुभव असलेल्या तेलिंचां हा राजकीय निर्णय आता नेमका काय वळण घेतो ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे. कारण काही वर्षांपूर्वी कणकवलीत उद्धव ठाकरे हे राजन तेलिंच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे राजन तेली व ठाकरे यांचे निकटचे संबंध आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात या ही मोठी घडामोडी घडणार आहे. त्यामुळे केसरकर विरुद्ध तेली असा दुहेरी सामना रंगणार की केसरकर, विशाल परब, राजन तेली, अर्चना घारे परब असा चौरंगी सामना होणार हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे .

दिगंबर वालावलकर/ कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!