विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा ची नवीन कार्यकारणी

आमदार नितेश राणेंना 60 हजार च्या वरती मताधिक्य मिळवून देणार

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांचा विश्वास

कणकवली तालुका युवा मोर्चा बैठक भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चा तालुका निहाय बैठका सुरुवात होऊन आज कणकवली येथे युवा मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा परिषद गटनीहाय बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले यावेळी युवा मोर्चाच्या विस्तारित कार्यकारणी देखील करण्यात आली. नवनियुक्त युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम ,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री ,तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष अण्णा खाडये, सर्वेश दळवी ,गणेश तळगावकर ,शहराध्यक्ष सागर राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आली. महायुतीच्या गेल्या अडीच वर्षातील लोकाभिमुख योजना विकास कामे आणि आमदार नितेश राणे यांनी मतदारसंघात राबविलेल्या सर्व योजना, विकास कामे ,जनसंपर्क आणि भाजपा कार्यकर्त्यांच मेहनतीच्या जोरावर आमदार नितेश राणे ६०,००० चे मताधिक्य घेत विजयी होतील असा विश्वास यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप यांनी व्यक्त केला, कुठलेही पद छोट किंवा मोठे नसतं प्रत्येकाने आपल्या पदाला प्रामाणिक न्याय दिल्यास पक्ष संघटना आणि नेते त्याची योग्य ती दखल घेत असतात त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी ताकदिने काम करून आमदार नितेश राणे यांचे काम घेऊन गावोगावी मतदारांपर्यंत पोहोचुया महायुतीचे सरकार आणण्यामध्ये युवा मोर्चाने महत्त्वाची भूमिका बजाऊया असे आवाहन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी केले. या बैठकीला भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर यांनी देखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
ग्रामीण मंडल विस्तारित कार्यकारिणी
चिन्मय तळेकर -उपाध्यक्ष
समीर नावलेकर -उपाध्यक्ष
सदाशिव बाबु राणे -उपाध्यक्ष
मिलिंद लाड सरचिटणीस
निरज मोरये -चिटणीस
गणेश लवेकर -चिटणीस

शक्ती केंद्रप्रमुख
अनुप तळेकर- तळेरे
संतोष रोडेये -खारेपाटण
संदेश सावंत- कासार्डे
प्रवीण डगरे- नांदगाव
भरत मोरे- फोंडा
प्रसाद राणे- लोरे
सचिन गुरव- वरवडे
तेजस लोकरे – कलमठ
शहर मंडल विस्तारित कार्यकारिणी
अभिषेक नाडकर्णी -उपाध्यक्ष
अक्षय शिंदे -उपाध्यक्ष
प्रशांत राणे -सरचिटणीस
विजय इंगळे -चिटणीस
संदेश सावंत -चिटणीस
प्रज्वल वर्दम -चिटणीस ,
सदस्यपदी राहुल आंगणे,गणेश कदम अक्षय वारंग,
शक्ती केंद्रप्रमुख
वैभव नार्वेकर – नरडवे
सागर सावंत- कुंभवडे
नयन दळवी -जाणवली
सोमनाथ चव्हाण -बिडवाडी
विनायक गोमणे -करूळ
नदीम पटेल -हरकुळ बुद्रुक
सुदर्शन राणे -कळसुली यासर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्रे देण्यात आली.

दिगंबर वालावलकर कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!