अवैध वाळू वाहतूकी विरोधात महसूलची कारवाई


रामगड येथे मंगळवारी रात्री डंपर पकडला


आचरा–अर्जुन बापर्डेकर

मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास रामगड गावचे हद्दीत वाळू वाहतूक करणारा डंपर एम एच ०७ ए जे १७१२ हा अंदाजे तीन ब्रासहवाळू वाहतूक करत असताना गौण खनिज वाहतूक विरोधी पथकाच्या नजरेस आला सदर डंपरचालकाकडे पथकाकडून परवान्याची मागणी केली असता आढळून आला नाही.त्यामुळे सदर गाडी ताब्यात घेऊन आचरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या वेळी आचरा तलाठी संतोष जाधव ,असरोंडी तलाठी काटे, त्रिंबक तलाठी रविराज शेजवल,पोलीस हवालदार तुकाराम पडवळ, पोलीस पाटील सुनील खरात आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!