कोळपेतील ठाकरे गटाचे शाखाप्रमुख, ग्रा. पं. सदस्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटाला सलग पाचव्या दिवशी जोरदार धक्का

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कोळपे येथील शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा. पं. सदस्य विलास माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आ. नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले. आमदार नितेश राणे यांनी दिलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कोळपे गावातील मानेवाडीतील जवळपास सर्वच ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये उबाठा शाखाप्रमुख विश्वजीत माने, ग्रा.प. सदस्य विलास माने, भिकाजी नारकर, सतीश नारकर, विक्रम नारकर, किशोर माने, किरण माने, वैशाली नारकर, तुकाराम माने, शैलेश माने, उत्तम माने, दिपाली नारकर, रूपाली नारकर, यशोदा नारकर, अनंत नारकर, मारुती नारकर, इब्राहिम नाचरे, रजनीकांत माने, महादेव शेलार, शिवाजी माने, बंड्या कदम, अनंत माने, रुपेश माने, दिनेश माने, कला माने, विनंती माने, सुचित शिंदे, संगीता माने, सविता माने, शितल माने, मनाली शिंदे, शुभांगी शिंदे, विजया शिंदे, सुगंधा शिंदे, सत्यवती कदम, शुभांगी कदम, आनंद कदम, बाळकृष्ण पाटणकर, सत्यवान पाटणकर व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सभापती भालचंद्र साठे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, किशोर दळवी, सत्यवान पवार, सुनील माने, किशोर माने, मंगेश फोंडके, जगनाथ शिंदे, मंगेश शिंदे, अनिल माने, संतोष नारकर व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!