स्मार्ट ग्राम मध्ये कोंडये ग्रामपंचायत कणकवली तालुक्यात प्रथम

सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांनी व्यक्त केले ग्रामस्थांचे आभार

या पुढच्या स्पर्धांमध्ये ग्रामपंचायत अव्वल ठेवणार

आर आर आबा पाटील स्मार्ट ग्राम (सूंदर गाव) योजनेअंतर्गत कणकवली तालुक्यात झालेल्या मूल्यांकनात कणकवली तालुक्यातील कोंडये ग्रामपंचायतला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.या स्पर्धेसाठी कणकवली तालुक्यातून मूल्यांकन करण्यात आले होते. या निकषांमध्ये 100 पैकी 97 गुण मिळवत कोंडये व साळीस्टे ग्रामपंचायतीने विभागून प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायत ने मिळवलेल्या यशाबद्दल कोंडये ग्रामपंचायत व सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. हा पुरस्कार प्राप्त होण्यासाठी उपसरपंच श्री रवींद्र तेली, ग्रा पं सदस्य श्री सुहास बिर्जे,श्री कमलेश तिरोडकर,श्रीमती अनिता घाडीगावकर,स्वप्नाली सावंत,रिया तीरोडकर, क्षितिजा तांबे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती नयना मिठबावकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री संदेश घाडीगावकर,श्रीमती अस्मिता पन्हाळकर, मनाली जोईल, तंटामुक्त अध्यक्ष संजय सावंत, व आशा सेविका सिमरन तांबे सर्व शिक्षक, तसेच अंगणवाडी सेविका प्रमिला फोपे, सोनाली परब सर्व बचत गट प्रतिनिधी तसेच सर्व गावातील ग्रामस्थ या सर्वांचे सहकार्य लाभले अशी माहिती सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांनी दिली. या सर्वांचे आभार सरपंच यांनी मानले आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!