“तो” येतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी!

कणकवली शहरातील बॅनर नेमका कोणाला उद्देशून?

बॅनर कोणी लावला? अस्पष्ट पक्षांतर कुरबुरी की राणेंना टोला?

कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून काही नावे इच्छुकांच्या यादीत असताना आता या जागेसाठी हळूहळू रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपाकडून नितेश राणे हे उमेदवार निश्चित असताना मात्र ठाकरे गटाचे उमेदवार कोण हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच सर्वांकडूनच उमेदवारीसाठी मोर्चे बांधणी केली जात असताना काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक देखील झाली. या बैठकीत अंतिम निर्णय झाला नसला तरी काही कडून लॉबिंग केलं गेल्याची ही चर्चा सुरू होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल “तो येतोय” सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घराणेशाही नष्ट करण्यासाठी” कणकवली विधानसभा व त्याखाली मशाल चिन्ह अशा आशयाचा बॅनर लावला गेला आहे. हा बॅनर ठाकरे गटाकडून लावला गेला असल्याचे प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी त्याची अधिकृत जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही. आमदार नितेश राणे यांना हा इशारा देणारा बॅनर असला असे बोलले जात असले तरी घराणे शाही चा आरोप हा ठाकरे गटातील इच्छुकांवरही येऊ शकतो अशी देखील चर्चा दबक्या आवाजात केली जात आहे. पक्षांतर्गत कुरबुरी तुन याचा रोख युवा सेना जिल्हाप्रमुख इच्छुक उमेदवार सुशांत नाईक यांच्यावर देखील असू शकतो. अशी चर्चा आहे. मात्र तो तसा आहे का? हे अद्याप तरी कोणी स्पष्ट केले नाही. त्यामुळे या उलट सुलट चर्चांमुळे हा बॅनर सध्या कणकवली सह जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे अशा बॅनर च्या माध्यमातून “तो येतोय” तो येणारा कोण? असणार ते लवकरच स्पष्ट होणार आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!