ढगफुटी सदृश्य पावसाने पणदूर – वेताळ बांबर्डे गावे जोडणारा ब्रीज गेला वाहून

दोन्ही गावचा संपर्क तुटला

कुडाळ तालुक्यात सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे पणदूर आणि वेताळ बांबर्डे ही दोन गावे जोडणारा ब्रीज कम बंधारा वाहून गेला. ही घटना आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, पणदूर गावातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पणदूर आणि वेताळ बांबर्डे गावचा संपर्क तुटला असून नागरिकांना ७ ते ८ किमी अंतर पूर्ण करून जावे लागणार आहे.

error: Content is protected !!