युवा परिवर्तन प्रतिष्ठान-लोरे च्या वतीने रक्तदान शिबिर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे झाले उद्घाटन

युवा परिवर्तन प्रतिष्ठान – लोरे चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंदू रावराणे यांच्या वतीने फोंडाघाट रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेली 10 वर्षे चंदू रावराणे व युवा परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत आहेत. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीनगर महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्री रावराणे यांनी सामाजिक कार्याचा वसा आपण कायम ठेवावा. आपण गेली 10 वर्षे राबवत असलेला रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रम यामुळे गरजू लोकांना याचे सहाय्य होते.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत, उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, महिला उपतालुका प्रमुख संजना कोलते, माधवी दळवी, प्रितम रावराणे, रमेश राणे, चंदू मेस्त्री, उमेश नवले, वैभव देवलकर, योगेश रावराणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!