जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धेत “श्वेताज योगा ग्रुपचे” घवघवीत यश.

14 वर्षाखालील मुले तसेच 14,17आणि 19 वर्षाखालील मुली या गटात ग्रुपचे विदयार्थी जिल्ह्यात प्रथम.

कणकवली/प्रतिनिधी.

    दि. 26 आणि 27ऑगस्ट रोजी ओरोस क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील  मुलांनी सहभाग घेतला.या योगा स्पर्धेत मुलांमध्ये "14 वर्षाखालील मुले" गटात कु.भावेश घाडीगावकर या विद्यार्थ्याने 'प्रथम' क्रमांक प्राप्त केला व कु.कुणाल गवंडळकर याने चौथा क्रमांक प्राप्त केला.तसेच 14 वर्षाखालील मुली या वयोगटातून कुमारी.श्रेया डोईफोडे हिने प्रथम क्रमांक,17 वर्षाखालील मुली या वयोगटातून कुमारी.काव्या गवंडळकर प्रथम क्रमांक तर कुमारी.खुशबू गुप्ता तृतीय क्रमांक व कुमारी.गिरीजा मोहिते पाचवा क्रमांक आणि 

19 वर्षाखालील मुली या वयोगटातून कुमारी.अस्मि राव प्रथम क्रमांक आणि कुमारी.मीरा नवरे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
श्वेताज योगा ग्रुपच्या या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी करून जिल्हास्तरीय स्पर्धेत क्लास चे नाव रोशन केले आहे.
या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी,तसेच क्रीडा विभागाकडून श्री.सचिन रणदिवे, सिंधुदुर्ग योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सदस्य श्री.प्रकाश कोचरेकर,सदस्या सौ.श्वेता गावडे,पंच श्री.रवींद्र पावसकर,श्री.आनंद परब,सौ.नीता सावंत, सौ.अर्चना देसाई,कुमारी.मारिया अल्मेडा,सौ.शमीका केळुसकर,कुमारी.तेजल कुडतडकर,सौ.संजना पाटकर या सर्वांनी परीक्षण केले.
श्वेताज योगा क्लास-कणकवलीचे विद्यार्थी हे कायमच अश्या विविध योग स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करीत असतात.नुकत्याच अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले होते.या सर्व विद्यार्थ्यांना ग्रुपच्या संचालिका सौ.श्वेता गावडे यांचे मार्गदर्शन मिळते.
जिल्हास्तरीय शालेय स्पर्धामध्ये मुलींच्या तीनही गटांट या ग्रुपच्या विद्यार्थिनी प्रथम आल्यामुळे तसेच 14 वर्षाखालील मुले गटात देखील एक विद्यार्थी प्रथम आल्या कारणाने या ग्रुपचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!