कास्ट्राईब कर्मचारी महासंघ बेमुदत संपात सहभागी होणार

जिल्हाध्यक्ष संदीप कदम व सरचिटणीस किशोर कदम यांची माहिती

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपात
दिनांक 29 ऑगस्ट रोजीपासून कास्ट्राईब कर्मचारी महासंघ बेमुदत संपात सहभागी होत आहे .“ जुनी पेन्शन” “पदोन्नती ” आणि इतर मागण्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग अंतर्गत प्राथमिक शिक्षक संघटना , माध्यमिक शिक्षक संघटना तसेच कास्ट्राईबच्या इतर खाते निहाय जिल्हा संघटना ही संपूर्ण ताकदीनिशी संपात सहभागी होणार आहेत . याची नोंद सर्व सभासद बांधवानी घ्यावी असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहीती संदिप कदम
जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग व किशोर कदम सरचिटणीस
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!