स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटणच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे हेल्थ इन्शुरन्स व बँकेच्या विविध योजनांच्या माहितीचा जागर

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटणच्या वतीने शाखाधिकारी सौ.ढाणे मॅडम व स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल इन्शुरन्स श्री. प्रसाद राणे यांनी नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे बँकेच्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच हेल्थ इन्शुरन्स संदर्भात जाणीव जागृती करून बँकेच्या अनेक योजनाचा जागर मांडला.
खारेपाटण हायस्कूलचे मुख्यध्यापक श्री संजय सानप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री संतोष राऊत,श्री गुरसाळे सर,श्री हरयान सर,लिपिक श्री तेजस राऊत तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या धावपळीच्या जगात हेल्थ इन्शुरन्स किती महत्त्वाचा आहे हे एस बी आय चे जनरल इन्शुरन्स चे श्री प्रसाद राणे सविस्तरपणे पटवून सांगितले. याबरोबरच बँकेच्या विविध योजनांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
खारेपाटण हायस्कूलचे वतीने मुख्याध्यापक संजय यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटण च्या शाखाधिकारी श्रीम. ढाणे मॅडम व एस बी आय चे जनरल इन्शुरन्स चे
श्री प्रसाद राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!