कोळोशी येथील कॅन्सरग्रस्त योगेश कदम उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांनी घेतला पुढाकार

काही रक्कम जमा, अजून मदतीची गरज

नांदगाव दशक्रोशितील कोळोशी येथील कॅन्सरग्रस्त योगेश कदम युवकाच्या उपचाराच्या मदतीसाठी नागरिकांनी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांनी पुढाकार घेत केला होता.त्यानुसार सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानुसार तब्बल ६४ हजार ६५० रुपयांची रक्कम जमा करुन त्याच्या मदतीसाठी देण्यात आली आहे. अजूनही त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
याबाबत बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांनी स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि व्हाट्सअप स्टेटस वर मदतीची हाक सर्वसामान्य नागरिकांना दिली होती.
त्यामध्ये “आपल्या दशक्रोशितील कोळोशी गावातील आपल्या सर्वांच्या परिचयाचा योगेश कदम हा कॅन्सर सारखा भयानक आजाराने त्रस्त झाला आहे. घरची परिस्थिती पण खुप हालाखीची आहे. योगेश गवंडी काम करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.परंतु आज त्याच्या वाट्याला वाईट वेळ आली आहे. त्याच्यावर मुंबई येथील टाटा हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. तरी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, जी काही शक्य असेल ती आर्थिक मदत आपण सर्वांनी करूया आणि आपल्या मित्राला या संकटातून आजारातून बाहेर काढुयात ,तुमची आर्थिक मदत योगेश चे प्राण वाचवू शकते,अशा शब्दात बेळणे सरपंच अविनाश गिरकर यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते.त्यानुसार नागरिकांनी आतापर्यंत ६४ हजार ६५० रुपये जमा केले आहेत,ही आर्थिक मदत योगेश कदम यांना सुपूर्त करण्यात आली आहे.
अजूनही कोणाला मदत करायची असेल तर योगेश कदम च गूगल पे नंबर – 7710852927 हा असून यावर समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मदत करावी असे आवाहन अविनाश गिरकर यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!