कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी पदी गौरी पाटील यांची नियुक्ती

परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून शासनाचे आदेश
गेल्या अनेक महिन्यांनंतर कणकवली मुख्याधिकारी पदी नियुक्तीचे आदेश
गेले काही महिने रिक्त असलेल्या कणकवली नगरपंचायत च्या परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून गौरी विष्णू पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गट ब या श्रेणीतून ही नियुक्ती करण्यात आली असून, गेले अनेक महिने कणकवली मुख्याधिकारी पद रिक्त होते. सध्या या नगरपंचायत चा मुख्याधिकारी पदाचा कार्यभार पारितोष कंकाळ यांच्याकडे सोपवण्यात आला होता. गौरी विष्णू पाटील या प्रोबेशनरी काळातील मुख्याधिकारी म्हणून या ठिकाणी काम पाहणार असून, यापूर्वी प्रोबेशनरी काळात मुख्याधिकारी म्हणून येथे रुजू झालेले अवधूत तावडे हे तब्बल चार वर्षे कणकवलीत मुख्याधिकारी म्हणून राहिले होते. त्यानंतर प्रोबेशनरी मुख्याधिकारी म्हणून आता गौरी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती च्या जागी रुजू झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सादर करायचा आहे. शासनाने याबाबतचे आदेश काढले आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली





