बीडवाडी, वरवडे, पिसेकामते समन्वय विकास समिती अध्यक्षपदी अनंत मगर

आमदार नीतेश राणेंच्या प्रेरणेतून समितीची स्थापना
समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणार!
आमदार नीतेश राणे यांच्या प्रेरणेतून बीडबाडी, वरवडे, पिसेकामते येथील कार्यकर्त्यांची या तीन गावांची समन्वय विकास समिती स्थापन करण्यात आली आहे. पा समितीच्या अध्यक्षपदी अनंत मगर, उपाध्यक्षपदी सोनू सावंत, सुहास राणे, खजिनदारपदी प्रकाश सावंत, सचिवपदी आनंद साटम यांची निवड करण्यात आली आहे.
तिनही गावांच्या विकासाच्यादृष्टीने एकोपा, समन्वय व एकजूट ठेऊन विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, जशी माहिती अध्यक्ष श्री. मगर यांनी दिली आहे.
या समन्वय समितीमध्ये आनंद घाडीगांवकर, प्रदीप कदम, विजय कदम, हनुमंत बोंद्रे, बाबाजी चव्हाण, सत्यवान परब रामचंद्र घाडी, सोमनाथ चव्हाण, नितीन मोहिते, संकेत राणे आदींचा समावेश आहे.
श्री. मगर यांनी म्हटले आहे की, आम, नीतेश राणे यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघातः विकासकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यांच्या कार्याचा वेगळा उसा जनतेमध्ये उमटला आहे. त्याच्याच प्रेरणेतून बीडवाडी वरवडे आणि पिसेकामते या गावांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून विकासकामांसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेतच, याशिवाय विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
गावातून नवउद्योजक तयार व्हावेत त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदी विषयांतही समिती मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे. याच अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणाऱ्या गणेश चतुर्थीत भव्य अशी कणकवली तालुकास्तरीय गणेश मूर्ती सजावट स्पर्धा या समितीच्यावतीने घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून गणेश मूर्तीकार, गणेश आरास करणारे मक्त यांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांच्या कलेला दाद मिळविण्यासाठी कौतुकाची थाप पाठिवर देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. मगर यांनी दिली.
कणकवली प्रतिनिधी