युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वैभववाडी येथे “भगवा सप्ताह” निमित्त कोळपे जिल्हा परिषद चा गाव दौरा

नाधवडे, नापणे, कोकिसरे, उंबर्डे, कुंभवडे व करूळ येथे केल्या बुथ वार प्रचार कमिटी स्थापन

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिरात केलेल्या “भगवा सप्ताह” च्या निमित्ताने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वैभववाडी कोकिसरे विभागात झंजावती गाव दौरा बैठका घेतल्या. यात कोकिसरे विभागातील नाधवडे, नापणे, कोकिसरे, उंबर्डे, कुंभवडे व करूळ या गावात बैठका घेण्यात आल्या. व त्या ठिकाणी बुथ प्रमाणे गावची प्रचार कमिटी स्थापन करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, येत्या काळात आपली महाविकास आघाडीची सत्ता येणार व पुढचे पालकमंत्री हे आमदार वैभव नाईक असतील. येत्या दोन महिन्या नंतर महाविकास आघाडीची सत्ता येऊन जो प्रत्येक गावात विकास कामांचा राहिलेला बॅक लॉग पहिला पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांच्या परभवाचे शल्य हे आपल्या सगळ्यांना आहे, त्यामुळे पुढचा खासदार व येणारा आमदार हा आपलाच असला पाहिजे
. त्यासाठी प्रचार कमिटीने जोमाने काम करणं गरजेचे आहे. प्रचार कमिटी जे काही सूचना करेल त्या सूचना वरिष्ठ पातळीवर मांडल्या जातील. अश्या प्रकारे आपण संघटनावाढी साठी प्रयन्त केले पाहिजेत.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप सरवणकर यांनी देखील मार्गदर्शन केले, येणारा काल हा जरी संघर्षाचा असला तरी उद्धव ठाकरेंना परत एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपण परत एकदा सज्ज होऊया. यात वैभववाडी मतदार संघाची जबाबदारी आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. वैभववाडीतून सर्वाधिक्य मतदान होण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयन्त करू. असे यावेळी सरवणकर यांनी सांगितले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रज्जब रामदुल म्हणाले की, मेहनत घेतल्या वर नक्कीच मताधिक्य मिळत हे सर्वांनाच माहिती आहे. तर मेहनत ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. ज्या प्रमाणे उंबर्डे गावामध्ये मताधिक्य मिळाले त्या प्रमाणे जर सर्व गावामध्ये काम झालं तर शिवसेनेचा विजय हा निश्चितच आहे. बाळासाहेबांना माननारा शिवसेनेचा वर्ग आजही आहे, त्यानां भगवा सप्ताहाच्या निमित्ताने चेतना देऊन आपण परत एकदा जोमाने काम करणे गरजेचे आहे.
यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी म्हणाले, भगवा सप्ताह च्या निमित्ताने आपण सर्व जिल्हा परिषद च्या बैठका घेत आहोत, यात वैभववाडी ची जबाबदारी आपण सर्वांनी मिळून सज्ज होऊया.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत, उपजिल्हा प्रमुख संदीप सरवणकर, उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, उपजिल्हा प्रमुख रज्जब रमदुल, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, युवासेना तालुका प्रमुख रोहित पावसकर, जावेद पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सुरेश सावंत, बाबुराव चव्हाण, जनार्दन शिंदे, एकनाथ पाटील, वासुदेव चव्हाण, परशुराम राऊत, संभाजी सावंत, गणपत चव्हाण, राजाराम शिंदे, श्रीधर राऊत, हरिश्चंद्र राऊत, संतोष जाधव, जगन्नाथ शिंदे, दीपक चव्हाण, शिवाजी सावंत, रोशन कदम, जय भुतूर, आशिष शिर्गे, राज चव्हाण, चंद्रकांत चाळके, गजानन तावडे, भिकाजी सावंत, शांताराम चव्हाण, लवेश शिंदे,बाबुराव चव्हाण, सुरेखा चव्हाण, चैताली चाळके, नंदकुमार शिंदे, रियाज रमदुल, इम्रान पाटणकर, गौस पाटणकर, समीर लांजेकर, जुबेल रमदुल, हसन पाटणकर, विलास रमदुल, समीर नाचरे, महम्मद हनीफ, साबीर रमदुल, मेहमूद पाटणकर, मोहन पोर्लेकर, सोनाली पवार, वैशाली कुडाळकर, अनंत नांदसकर, नारायण गुरव, तुकाराम वळंजू, विश्वनाथ पवार, मधुकर, पाटील, अनंत पाटील, प्रकाश धोंड, तुकाराम गुरव, विठोबा कुडाळकर, प्रकाश कुडाळकर, रवि पोर्टेकर, लवू गुरव, दत्ताराम राणे, सागर पोर्लेकर, विठोजी पाटील, संदीप हांडे, अशोक गुरव, प्रकाश पाटील, लवू पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!