मालवाहतूक करणारे ट्रक बंद पडल्याने दाजीपूर परिसरात अवजड वाहनांची रांग
सिंधुदुर्गातून कोल्हापूरला जाणारे अनेक ट्रक वाटेतच रखडले
काल रात्रीपासून सुरू आहे हा प्रकार
सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा फोंडा घाटरस्ता यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याने या रस्त्यावर सध्या एक ना एक अनेक समस्या निर्माण होत आहेत. एक तर कोल्हापूर हद्दीत या घाट रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यातच काल रात्री दाजीपूर भागात या रस्त्यावर दोन ट्रक मालवाहक ट्रक बंद पडल्याने अक्षरशा दोन ते तीन किलोमीटर रांगा लागल्याने कोल्हापूर कडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीचा पुरता खोळंबा झाला. यामुळे येथील वाहन चालकांचे देखील मोठ्या प्रमाणावर हाल झाले. यामुळे कोल्हापूरहून सिंधुदुर्ग कडे येणारी वाहतूक ही काही प्रमाणात राऊतवाडी मार्गे वळवण्यात आली. एका अवजड वळणात एका बंद पडलेल्या ट्रकला साईड देऊन जाणारा दुसरा ट्रक देखील फसल्याने हा मार्ग पूर्णता ठप्प होता. कार वगळता अन्य वाहने या मार्गावरून मार्गस्थ होणे अडचणीचे होत होते. दरम्यान याबाबत सिंधुदुर्गातील प्रवाशांनी पोलिसांना देखील सदर घटनेची माहिती दिली.
दिगंबर वालावलकर /सिंधुदुर्ग