कणकवली बोरिवली बस फेरी पुन्हा सुरू होणार!

आमदार नितेश राणेंनी दिल्या होत्या सूचना

विभाग नियंत्रकांचे कणकवली आगार व्यवस्थापकांना आदेश

कणकवली – वैभववाडी – बोरीवली अशी बस फेरी चालु करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. त्या नुसार कार्यवाही करण्याचे आदेश कणकवली आगार प्रमुखांना विभाग नियंत्रक यांनी दिले आहेत. याबाबत विभाग नियंत्रकांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, आपल्या आगाराची सद्यस्थितीत स्थगित असणारी कणकवली बोरीवली (15.30) ही फेरी प्रायोगिक तत्वावर मार्गे फोंडा वैभववाडी तरळा अशी 08.08.2024 पासुन चालनात आणण्यात यावी.
सदरची फेरी दि.०८.०८.२०२४ पासून चालनात आल्या नंतर आपल्या आगाराच्या चालनिय किमी मध्ये १००२ किमी दि. १०.०८.२०२४ पासून वाढ होणार आहेत. व नियतांमध्ये दि.०९.०८.२०२४ पासून २ ने व चालक वाहक कर्तव्यात ४ ने वाढ होणार आहे. सदर फेरी वैभववाडी व फोडा या बसस्थानकांकरिता काही सीट कोटा आवश्यक असल्यास दि.०७.०८.२०२४ रोजी ११.०० पर्यंत कोणत्या स्थानकाकरिता कोणते आसन क्रमांक राखीव ठेववावेत याचे नियोजन करून या कार्यालयास कळविण्यात यावे.
सदरची फेरी संगणकीय आरक्षणास उपलब्ध करुन देण्यात येत असुन, सदर फेरी न सुटल्यास व प्रवासी तक्रार निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. सदरची फेरी ही प्रायोगिक तत्वावर चालु करण्यात येत असल्याने सदर फेरीचा चांगले भारमान मिळण्याच्या दृष्टीने सर्व बसस्थानकांवर जाहीरात करण्यात यावी. असे देखील आदेश देण्यात आले आहेत.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!