कोकण रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणापेक्षा प्लॅटफॉर्म सुधारण्याची गरज

माजी आमदार परशुराम उपरकर यांची मागणी

पालकमंत्र्यांनी लोकार्पण करण्यापूर्वी प्लॅटफॉर्मची पाहणी करावी

प्रवाशांची भरपावसात होणारी वाताहात दुदैवी

रेल्वे स्टेशन विमानतळाप्रमाणे सुशोभिकरण केल्याची वा-वाह कार्यकारी अभियंता , सर्व अधिकारी , पालकमंत्री दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ठेकेदार , अधिकारी , मंत्री हे मालामाल होत आहेत. पण जनता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर पाऊसात भिजत गाड्या पकडतात , हे दुदैवी आहे. रेल्वे स्टेशनच्या कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन बघावं की , त्या रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे. प्रवासी रेल्वेत चढताना – उतरताना प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्या प्लॅटफॉर्मवर ख-याअर्थाने सुशोभिकरण करण्याची गरज होती. अशी टीका माजी आ. परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ,
रेल्वे स्टेशनचे खालच्या बाजुने सुशोभिकरण करताना रेल्वेकडून करार करुन जागा घेतली , तशीच रेल्वेकडून प्लॅटफॉर्म करण्याकरीता जागा मिळू शकते. त्याचा उपयोग ख-याअर्थाने सर्वसामान्य जनता , नागरिक , चाकरमानी यांना होईल. आज एवढा मोठा खर्च करुन काम मिळवले ? ठेकेदाराची तुंबडी भरली. अधिका-यांना मलिदा मिळाला , आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री व बांधकाम मंत्री यांना झाला. बांधकाम मंत्र्यांनी आपला आणलेला कार्यकारी अभियंता यांच्या कामाचा कशा प्रकारे निकृष्ठ होतात. भुईबावडा घाटामध्ये कोसळलेली भिंत , फोंडाघाटात पडलेला खड्डा त्यानंतर मालवण रेस्ट हाऊसला पडलेला खड्डा , कणकवली रेस्ट हाऊसची काच वरुन खाली पडली . कोट्यावधी रुपये खर्च केलेलें कार्यकारी अभियंतांमुळे वाया गेले. या सगळ्या कामांची पालकमंत्री , बांधकाम रविंद्र चव्हाण पाहणी करणार का ? असा सवाल माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला.
ख-याअर्थाने जनतेचे रस्ते आणि निर्माण करण्याच काम शासन करत असताना पालकमंत्री कार्यकरी अभियंतांना पाठीशी घातल आहेत. 11 कोटी रुपये रेल्वे स्टेशन दुरुस्तीसाठी आणि वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुरुस्ती साठी 23 कोटी मंजुर करण्यात आले आहेत. पालकमंत्र्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय बघावे , त्या रुग्णालयातून जनतेला सेवा मिळते का बघावी . आपले लाडके आमदार रेल्वे स्टेशन , एस.टी स्टॅंड पाहणी करत फिरतायेत . परंतु त्यांना कणकवलीचे रुग्णालयात रुग्णांना सेवा आणि डॉ देवू शकत नाहीत. जनतेला कोणत्या सुविधा लागणार त्या न बघता कोकण रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेत दुस-याचे बाळ आपण घेतल्यासारखे आहेत. भविष्यात आता रेल्वे स्टेशन सुशोभिकरण केले. त्याचा मेन्टेनन्स कोण करणार ? तुमच्याकडे निधी आहे का ? तसेच जिल्हाधिकारी कर्यालय जे 23 कोटी खर्च करुन लिफ्ट बसवून बोगस लाईट फिटींग केली आहे. त्याच्या मेन्टेनन्ससाठी जिल्हाधिका-यांकडे पैसे आहेत का ? पालकमंत्री बांधकाम मंत्री म्हणून एका कार्यकारी अभियंत्याला किती लाढवणार ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला.

रेल्वेच्या शिल्पकार मधु दंडवते यांचा विसर –
कोकण रेल्वेच्या रेल्वे स्टेशनचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. मात्र या सुशोभिकरणात काही फोटो स्ट्र्रक्चर उभारण्यात आले . मात्र या कामात रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा विसर पडला आहे. त्यांची आठवण नाहीशी करण्याचा प्रयत्न पालकमंत्री व आमदारांचा आहे. असा टोला परशुराम उपरकर यांनी केला.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!