आचरा येथे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम महसूल पंधरवड्या निमित्त आयोजन
आचरा-अर्जुन बापर्डेकर
महसूल पंधरवड्या निमित्त सोमवार 5ऑगष्ट रोजी सकाळी ठिक अकरा वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा नजिक, आचरा तिठा येथे कृषि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांना कृषीविषयक योजना, मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ,शेतकरी बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी केले आहे.