1990 च्या 10वी बॅचच्या विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता ,स्वखर्चाने केली डागडुजी

सौ इंदिराबाई दत्ताञय वर्दम हायस्कूल पोईप विरणचे माजी मुख्याध्यापक फर्नांडिस सर यांच्या हस्ते फित कापून झाले वर्ग खोलीचे उद्घाटन

या प्रशालेत जे जे विद्यार्थी शिकुन गेले आहेत त्यांनी एकञ यावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव यांनी केले आहे

संतोष हिवाळेकर पोईप

मालवण तालुक्यातील पोईप येथील सौ.द . वर्दम हायस्कूलच्या सन 1990 च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेवरती अनोखी कृतज्ञता व्यक्त केली आहे .या हायस्कूलच्या नवी ब वर्ग होलीचे नूतनीकरण माजी विद्यार्थ्यांकडून उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आले 1990 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी यासाठी आर्थिक योगदान केले या वर्ग खोलीचे उद्घाटन प्रशालेचे माजी मुख्याध्यापक इसेद फर्नांडिस सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गरजू चार विषयाला विद्यार्थ्यांना गणवेशाला लागणारी रोख रक्कम या माजी विद्यार्थ्यांनी प्रदान केले. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजीत केली होती. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत पाचवी ते सातवी गट ,आठवी ते दहावी गट, आणि अकरावी ते बारावी गट अशा गटात वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती .यामध्ये प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले होते या विजयी स्पर्धकांना माजी विद्यार्थ्यांनी रोख रक्कम व ट्रॉफी अशी दिली तसेच प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केली
शाळा उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर पोईप सर्कल एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव ,उपसचिव महेश पालव, खजिनदार महेंद्र पालव, सदस्य विश्वनाथ पालव, सत्यवान पालव, विलास माधव ,श्रीकृष्ण माधव, सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक फर्नांडिस सर ,सीमा पोईपकर ,चव्हाण सर ,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कुंभार सर ,शिक्षक वर्ग आणि 1990 दहावी बॅच चे माजी विद्यार्थी विनय चव्हाण ,जगदीश आंबेरकर ,महेश पालव, अनिल पालव, प्रशांत राणे, राजेंद्र धुरी ,महेश मुरारी पालव, उमेश तावडे, धोंडी परब ,सुगंधी पांजरी, महानंदा धुरी ,स्मिता पालव, हेमलता तावडे व इतर उपस्थित होते .

यावेळी बोलताना माजी विद्यार्थी विनय चव्हाण यांनी सांगितले की आम्हच्या बॅच कडून जे जे सहकार्य लागेल ते आम्ही करू तसेच या प्रशालेत शिकुन मोठे झालो त्या प्रशालेचे ऋणी आहोत ते ऋण फेडण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि एक सांगतो की जे विद्यार्थी या प्रशालेत शिकुन गेले आहेत त्यांनी एकञ या

यावेळी पोईप सर्कल एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव. म्हणाले की आज माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल कौतुक केले असे सहकार्य करत रा असे यावेळी सांगितले

.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केतकी सावंत तर आभार महाजन सर यांनी केले

error: Content is protected !!