बांधकाम कामगार नोंदणीचा प्रश्न सोडविण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाचे जि.प. सी.ई.ओ. यांना निवेदन

      बांधकाम कामगारांच्या नोंदणीच्या प्रश्नाबाबत आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.)  यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभागप्रमुख विकास राऊळ, राजू घाडी उपस्थित होते. 

     या निवेदनात म्हटले आहे कि, बांधकाम कामगार नोंदणी करतेवेळी सदर अर्जावर संबंधित गावातील ग्रामसेवकाची सही व शिक्का घेण्याची अट घातलेली आहे. असे असताना बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवक हे सदर सही शिक्का देण्यास नकार देतात परिणामी अनेक कामगारांची नोंदणी होत नाही परिणामी शासनाच्या या योजनेच्या लाभापासून अनेक कामगार हे वंचित राहत आहेत याला जबाबदार कोण ? अशी विचारणा करत सदर योजनेत आवश्यक बदल करून सर्व बांधकाम कामगारांना याचा लाभ देण्याची कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी केली त्याला सी.ई.ओ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!