कणकवली शहरातील समस्यांबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रमोदशेठ मसूरकर यांनी वेधले लक्ष

डास प्रतिबंधक फवारणी, कीनई रस्त्याच्या खड्यांचा प्रश्न तातडीने सोडवा
सध्या पावसाळा असल्याने कणकवली शहरात डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या सारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे.
म्हणूनच साथीच्या रोगांचा कणकवली वासियांना त्रास होऊ नये, यासाठी आपण संपूर्ण कणकवली शहरात डास निर्मूलन प्रतिबंधक फवारणी लवकरात लवकर करावी, तसेच कणकवली शहरातील किनई रोड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे पादचारी व वाहनधारक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तरी सदरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत. अशी मागणी शिवसेना कणकवली शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणकवली, प्रतिनिधी