वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान मध्ये होणार अभाषिक नाट्यकृती साकार

25 जुलै रोजी उपस्थित राहण्याचे आयोजकांतर्फे आवाहन

उद्धट मौन सौंदर्याच्या सामाजिक मापदंडांना आव्हान देणारी आणि धर्माच्या मानवी, विशेषतः स्त्री देहावरील प्रभावाला प्रश्न विचारणारी ही अभाषिक नाट्यकृती
फ्लेमिंगो थिएटर्स, गोवा यांनी प्रथम २०१८ मध्ये सादर केली.
केवळ शारीर आणि मूक अभिनयाच्या प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करणारी ही नाट्यकृती आत्तापर्यंत देशभरात ४७ ठिकाणी सादर झाली आहे.
बाह्यरूप आणि सुंदरतेचा खरा अर्थ शोधू पाहणारा हा नाट्य-आविष्कार पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण दिनांक २५ जुलै, २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ७.३० वाजता यावे म्हणून हे आग्रहाचे निमंत्रण.
संकल्पना आणि दिग्दर्शन: केतन जाधव
कलावंत: अमोदी सानप
कालावधी: ५० मिनिटे
स्थळ: वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कलासंकुल येथे होणार आहे

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!