कलमठ मधील वनिता परुळेकर यांचे निधन
कणकवली तालुक्यातील कलमठ कलेश्वरनगर येथील रहिवासी सौ वनिता रमेश परूळेकर (वय ७८ ) यांचे मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्या मुंबईतील हायस्कूल मध्ये मुख्याध्यापिका या पदावर काम करून निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात पती,एक मुलगी असा परिवार आहे. कणकवली मधील सुभाष परूळेकर आणि सुरेश परुळेकर यांच्या वहिनी होत.
कणकवली प्रतिनिधी





