नांदगाव मध्ये विद्यार्थ्यांनी भरवला गावठी वस्तूंचा बाजार

अनेक रानभाज्या होत्या या बाजारात उपलब्ध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे माध्यमिक प्रशालेच्या वतीने “केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत आयोजित” “शिक्षण सप्ताह” अंतर्गत “कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस” साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विक्री कौशल्य व विपणन कौशल्य (मार्केटिंग) याची ओळख करण्याकरिता सरस्वती हायस्कूल नांदगाव तर्फे “गावठी माल” खरेदी विक्री बाजाराचे आयोजन नांदगाव तिठ्ठा येथे करण्यात आले यावेळी सकाळपासून नागरीकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी विविध दुकाने मांडून या उपक्रमाचा आनंद घेतला.
या बाजारामध्ये सरस्वती हायस्कूल नांदगावचे विद्यार्थी विविध प्रकारच्या रानभाज्या, गावठी पीठ, कोकणी मेवा, रानमेवा, गावठी तांदूळ, गावठी अंडी, गावठी कोंबडी इत्यादी विविध प्रकारच्या मालाची विक्री सुरू ईतर विद्यार्थ्यांकडून गावठी माल खरेदी करण्यासाठी एकच झुंबड लागली होती. यासाठी सरस्वती हायस्कूल नांदगावचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यानी विशेष मेहनत घेतली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!