न्यू इंग्लिश स्कूल शाळा समिती कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
आचरा–अर्जुन बापर्डेकर
स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांना प्रोत्साहन मिळावे, त्या मुलांचा आदर्श इतर मुलांनी घेऊन स्पर्धा परीक्षेत यशमिळवून शाळेचा नावलौकिक वाढवावा या उद्देशाने न्यू इंग्लिश स्थानिक स्कूल समिती तर्फे आठवी स्कॉलरशिप आणि एन एम एम एस परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. यावेळी स्थानिक स्कूल समिती अध्यक्ष निलिमा सावंत यांनी विद्यार्थ्यांनी यश संपादन करुन शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले. यावेळी स्कूल समिती सदस्य बाबाजी भिसळे,अर्जुन बापर्डेकर, संजय पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडे,प्रकाश महाभोज सर,राजमसर आदी उपस्थित होते