स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश

पोलिसांची गठित करण्यात आली होती विविध पथके
मोटर सायकल चोरांचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 150/2024, भारतीय दंड विधान कलम 379 हा गुन्हा दिनांक 13.06.2024 रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात शिवाजी महाराज पार्क, तुपटवाडी, कुडाळ या ठिकाणाहून बुलेट मोटर सायकल क्रमांक MH-07-AM-8937 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेलेली होती.मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांनी सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे मोटार सायकल चोरीचा तपास करणेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून विशेष पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. वर नमूद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना, दिनांक 11.07.2024 रोजी गुन्ह्यात चोरीस गेलेली वरील बुलेट मोटर सायकल ही गडहिंग्लज जि. कोल्हापूर येथे राहणारे दोन चोरट्यांनी चोरलेबाबत तपासामध्ये उघड झाल्याने, तसेच सदर आरोपींचे वास्तव्याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेवरून, श्री. हेमचंद्र खोपडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकाने गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे जाऊन, आरोपीं विषयी सविस्तर माहिती घेतली. त्यांचा गडहिंग्लज तालुक्यात कसोशीने शोध घेवून दोन्ही आरोपिंना ताब्यात घेतले. तसेच त्यांचेकडे तपास/चौकशी करुन गुन्ह्यात चोरीस गेलेली 1,00,000/- रुपये किंमतीची बुलेट मोटर सायकल आरोपींकडून हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे. दोन्ही आरोपी व मोटार सायकल पुढील कायदेशीर कारवाईकरीता कुडाळ पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले असून पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.सदरची कारवाई हेंमचंद्र खोपडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. समीर भोसले, पोलीस उपनिरीक्षक, श्री. रामचंद्र शेळके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सहा. पोलीस उपनिरीक्षक, गुरूनाथ कोयंडे, पोलीस हवालदार श्री. प्रकाश कदम, बस्त्याव डिसोजा व चंद्रकांत पालकर यांनी केलेली आहे. तसेच जिल्ह्यात अ-उघड असलेले गुन्हे उघडकीस आणणेसाठी प्रयत्नशील आहोत.
कणकवली, प्रतिनिधी