पुळास येथील साकवाचा वाहून गेलेला रॅम्प पुन्हा बनवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार

  अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील पुळास येथील साकवाचा रॅम्प पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यामुळे गाड सावंत टेंब, राऊळवाडी, धनगरवाडी येथील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग गेले ४ दिवस बंद होता. विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत होती.हि बाब  माजी जि. प. सदस्य राजू कविटकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून त्याठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने रॅम्प मध्ये भराव टाकून रॅम्प पुन्हा बनवून देत नागरिकांची गैरसोय दूर केली. त्याबद्ल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले. 
      यावेळी माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, सरपंच बाबी निकम,  निलेश गाड, लवु गाड, महादेव सावंत, कृष्णा गाड, धोंडी राऊळ, प्रकाश राऊळ, सिदु लांबर व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते.

कुडाळ प्रतिनिधी

error: Content is protected !!