बांदिवडे भगवंतगड मार्गावरील पुलाची दुरास्त करावे–आशिष नाबर

आचरा–अर्जुन बापर्डेकर
सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाने बांदिवडे भगवंतगड जोडणारया पुलाची मोठ्या प्रमाणात हाणी झाली असून वाहतूकीस धोकादायक बनला आहे.याबाबत स्थानिक व राज्य प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी शिंदे गट शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते आशिष नाबर यांनी केली आहे .
आचरा चिंदर मार्गे बांदिवडे मसुरे ओरोस आदी भागात जाण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून भगवंतगड पुलाचा उपयोग केला जातो. सोमवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे या पुलाची मोठ्या प्रमाणात धूप झाली त्यामुळे वाहतूक धोकादायक झाली आहे .आचरा हायस्कूलला जाणारया विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.
याबाबत पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी लक्ष देण्याची मागणी केली आहे.
येथील स्थानिक आमदार हे फक्त कुडाळमध्येच व्यस्त आहेत त्यांना या पुलाच्या दुर्दशेकडे लक्ष देण्यास वेळ नाही. छोटे पॅकेज असल्याने
किंबहुना ते टाळताळ करत असल्याची टिका त्यांनी केली आहे.यामुळे
उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भैया सामंत
मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी या बाबत तात्काळ लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे

error: Content is protected !!