आचरा बाजारपेठ येथे पक्की गटारे बांधा-

आचरा सरपंच फर्नांडिस यांची बांधकाम विभागाकडे मागणी


आचरा-अर्जुन बापर्डेकर
आचरा बाजारपेठ येथे पक्की गटारे बांधण्याबाबत आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कणकवली यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे .
याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता प्रभू यांना त्यांनी दिले.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच संतोष मिराशी ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर पंकज आचरेकर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम तसेच सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश परुळेकर आदी उपस्थित होते
या निवेदनात त्यांनी आचरा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील बाजारपेठेमध्ये कणकवली आचरा बंदर हा रस्ता जात आहे. आचराबाजारपेठेमध्ये या रस्त्यावर दोन्ही बाजूने गटार जात असून ती अद्याप पक्की केलेली नाहीत त्यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे .तसेच या रस्त्यावर आठवडा बाजार दिवशी व्यापारी बसत असल्याने वाहतुकीला त्रासदायक होत आहे सदरची गटारे पक्की झाल्यास वाहतुकीची होणारी गैरसोय बाजारादिवशी होणारी कोंडी दूर होणार आहे तरी त्वरित गटार बांधण्याची व्यवस्था करणे अशी मागणी त्यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे

error: Content is protected !!