आर पी बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी अर्चना कोदे

मसुरे : मसुरे येथील आर पी बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी अर्चना को दे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अर्चना कोदे गेली 24 वर्षे शिक्षकी सेवेत असून त्या बॅरिस्टर नातपई सेवांग मालवण सारख्या अनेक सामाजिक कामांशी निगडित आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. संस्थेच्या वतीने कोदे यांचा नुकताच गौरव करण्यात आला.