स्वरभास्कर कै.बुवा समीर रामा कदम यांच्या स्मरणार्थ कणकवलीत शोकसभा संपन्न.

कणकवली : मयूर ठाकूर
भजन क्षेत्रातील कलाकार स्वर्गीय स्वरभास्कर बुवा कै.समीर रामा कदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेली शोकसभा रविवार,दि.२० सप्टेंबर २०२६ रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय,लांजेवाडी कलमठ,ता.कणकवली येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित शोकसभेत भजन क्षेत्रातील कलाकार, पदाधिकारी,रसिक तसेच स्वर्गीय कै.समीर रामा कदम यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी उपस्थितांनी कै.समीर रामा कदम यांच्या भजन क्षेत्रातील योगदान,त्यांच्या प्रेमळ स्वभावाच्या आणि सहकार्याच्या आठवणींना उजाळा दिला.त्यांच्या अकाली निधनाने भजनी क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.शोकसभेदरम्यान उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून कै.समीर रामा कदम यांना श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग सहभागी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.“कै. समीर रामा कदम यांची भजनसेवा आणि त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील,” अशी भावना उपस्थित भजनी कलाकारांनी व्यक्त केली. प्रसंगी स्वर्गीय स्वरभास्कर कै.बुवा समीर कदम यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आवाहन देखील करण्यात आले.
या शोकसभेला जेष्ठ बुवा प्रमोद हर्यांन,स्वर्गीय स्वरभास्कर कै.समीर कदम यांचे गुरु बुवा सुशील गोठणकर,बुवा राजा दळवी,कलाकार मानधन समिती सदस्य बुवा गुंडू सावंत,बुवा चंद्रकांत जाधव,भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग चे अध्यक्ष बुवा संतोष कानडे,सचिव बुवा गोपी लाड,उपाध्यक्ष बुवा ज्ञानदेव मेस्त्री,उपाध्यक्ष श्री.वैभव खानोलकर, उपाध्यक्ष बुवा संदीप नाईकधुरे,सह सचिव हेमंत तवटे,सह खजिनदार बुवा मयूर ठाकूर,संचालक संतोष मिराशी,संचालक बुवा नामदेव गिरकर मार्गदर्शक बुवा विकास गुरव,संचालक बुवा निलेश ठाकूर,संचालक बुवा दीपक पाळेकर,बुवा रवी कदम,कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे संचालक जेष्ठ बुवा दया राणे,बुवा संतोष जोईल,बुवा ऋषी ठाकूर,स्वर्गीय कदम बुवा यांचे काका संजय कदम तसेच भजन क्षेत्रातील भजनी कलाकार आणि बुवांवर प्रेम करणारा बुवांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.






