आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निवासस्थानी घेतले गणरायाचे दर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास व जनतेच्या प्रश्नाबाबत झाली चर्चा
भाजपाचे कोकणचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामांसंदर्भात तसेच इतर अन्य जनतेच्या प्रश्नांबाबत चर्चा देखील केली.






