हरकुळ ल.गो सामंत विद्यालयात SSC बॅच मार्फत वह्या आणि छत्री वाटप.

कणकवली/मयुर ठाकूर

मंगळवार दि. २५ जून २०२४ रोजी हरकुळ बु II. समता सेवा संघ मुंबई संचलित ल. गो. सामंत विद्यालय आणि अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयात SSC बँच २००१ मार्फत वह्या व छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी हरकुळ बु II. समता सेवा संघाचे कार्याध्यक्ष मा. श्री. मोहमद हनीफभाई पटेल, सदस्य बाबासाहेब वर्देकर, सुनिल घाडीगांवकर SSC २००१ सालचे विद्यार्थी बापू वाडेकर, प्रमोद भोगटे, दिपक मेस्त्री, सौ. शितल पेडणेकर, श्रीम. सुप्रिया दर्पण नानचे, श्री. मुन्ना पटेल उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नेवाळकर सर यांनी उपस्थितांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रशालेतील प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिना सहा वह्या व एक छत्री असे सुमारे ५० हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. हरकुळ बु II. कसालकरवाडीतील पालक संजय ठाकूर यांनी रोख ५ हजार रुपयांची देणगी शाळेला सुफुर्त केली. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सौ. तांबे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नेवाळकर सर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. अश्या प्रकारे मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालयात पार पडला.

error: Content is protected !!