श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

संतोष हिवाळेकर पोईप
योग हे निरोगी जीवनशैली जगायला शिकवणारे शास्त्र आहे. योग साधनेतून आपण कितीतरी असाध्य रोगांवर विजय मिळवू शकतो. हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना योग साधनेचा परिचय होऊन, विद्यार्थी योग साधनेकडे वळण्यासाठी दरवर्षी प्रशालेत योग दिन साजरा केला जातो.
या कार्यक्रमाची सुरुवात इशस्तवनाने झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व सांगत प्रशालेतील मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल , शिक्षिका वेदिका दळवी, प्रतिभा केळुसकर यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवली. यामध्ये ताडासन, भुजंगासन, सिंहासन, मकरासन, मयूर आसन, वृक्षासन, सर्वांगासन, इ.आसनांचा समावेश होता.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कुबल सर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक आसनाचे महत्त्व समजावून सांगत त्या आसनाचे शरीराला होणारे फायदे समजावून सांगितले. तर ‘योग म्हणजे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली’ असे त्यांनी प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.