मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला
मालवण : महाविद्यालयात विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासाच्यादृष्टीने विविध उपक्रम, स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यानी सहभागी होणे आवश्यक असते. स्पर्धेत सहभागी झाल्यावर यश अपयश येत असते, परंतु विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते म्हणून स्पर्धेत विध्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपला सर्वंकष विकास साधावा असे प्रतिपादन कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांनी येथे
बोलताना केले
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला
याप्रसंगी अॅड समीर गव्हाणकर, स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, पत्रकार शेखर सामंत , प्रा. कैलास राबते, प्रा. सुमेधा नाईक, प्रा. बी एच चौगुले, प्रा एच. एम. चौगले, संदेश कोयंडे, विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार यादव, प्रिती बांदल, ज्योती तोरसकर आदि उपस्थित होते वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात महाविद्यालयीन स्तरावरील तसेच युवा महोत्सवात यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आली.
संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांनी युवा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिळतो. विभागापासून ते देशपातळीपर्यंत विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुमेधा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. उज्वला सामंत, प्रा. रविंद्र गावडे, पी. बी. खरात यांनी केले. आभार एच एम चौगले यांनी मानले.
मालवण / कोकण नाऊ / ब्युरो न्यूज