‘निर्भय बनो’ सभा विरोधात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची तक्रार

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे केली तक्रार
निलेश जोशी | कुडाळ : निर्भय बनो चळवळ नावखाली अराजकीय सभा सांगुन परवानगी मागीतली जाते. आणि या सभांमध्ये राष्ट्र विरोधी भाषणे केली जात आहेत. त्यामुळे या सभांवर राजकीय सभाप्रमाणे कार्यवाही करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
तक्रार अर्जात धीरज परब यांनी म्हटले आहे, लोकसभा निवडणुक जाहीर झाली असुन, अशा सभेमधील वक्ते हे विशिष्ट पक्षांच्या विरोधात, धोरणा विरोधात, निर्णया विरोधात भाषणे करुन, विशिष्ट नेत्यांच्या विषयी मतप्रवाह दुषीत व्हावा या उद्देशाने वक्तव्ये करत आहेत.
आयोजकांनी पक्षीय प्रचार सभा घ्याव्यात, पण अराजकीय सांगुन पक्षीय प्रचार करु नये. असे तक्रारीत म्हटले आहे.
सदर सभांमध्ये वक्ते आयोजनाचा खर्च, विविध परवानग्या या विषयी शहानिशा करावी, निवडणुक प्रक्रीये प्रमाणे व्हीडीओ शुटींग करावे. राजकीय संदर्भातील भाषणे किंवा मतदान संबंधीत वक्तवे केल्यास प्रचलीत कायद्याप्रमाणे कारवाई व्हावी. अशी मागणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ





