नाटळ श्री रामपंचायतन येथे रामनवमी उत्सव

विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाटळ ग्राम परिवार देवता श्री देव रामपंचायतनचा वार्षिक रामनवमी उत्सव बुधवार 17 एप्रिल रोजी साजरा होणार आहे. या उत्सवास गुढीपाडव्यापासून प्रारंभ होतो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उत्सवाची घटस्थापना झाल्यापासून गेले आठ दिवस नित्य महाआरती, नैवेद्य, ग्रंथ वाचन, हरिपाठ आदी कार्यक्रम झाले. रामजन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम बुधवार 17 एप्रिल रोजी होणार असून त्यानिमित्त सकाळी 9 ते 12 वा. हभप सुरेश मेस्त्री (नाटळ सुतारवाडी) यांचे रामजन्मावर आधारीत कीर्तन, दु.12 वा. रामजन्म सोहळा, दु.12.30 वा. महाआरती, तिर्थप्रसाद, दु.1 वा.पासून अखंड महाप्रसाद, सायं. 4.30 वा. गुढीचे उत्तरपूजन, सायं.7.30 वा. महाआरती, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त नाटळ ग्रामस्थांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!