केंद्र प्रमुख सुगंधा केदार गुरव यांना सेवानिवृत्तीपर सन्मान

आचरा–अर्जुन बापर्डेकर सुगंधा केदार गुरव. केंद्रप्रमुख केंद्र आचरे तालुका मालवण या केंद्रप्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्ताने केंद्रशाळा आचरे नंबर एक येथे शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्गातर्फे
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयप्रकाश परुळेकर,यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.. यावेळी व्यासपीठावर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मंगेश मेस्त्री, माता पालक संघ उपाध्यक्ष शमा शेख, माजी उपाध्यक्षा सुरेखा सामंत,मुख्याध्यापक चंद्रकांत माने, पांडुरंग कोचरेकर,आबा भाटकर, हरीश गुरव, नवनाथ भोळे, मंगेश कांबळी नारायण मेस्त्री व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.शिक्षक वर्ग, अखिल भारतीय शिक्षक समिती आचरे प्रभाग, .आचरे उर्दू शाळा यांनी गुरव यांना यावेळी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्रीमती सुगंधा गुरव यांनी आपण बालवाडी पासून सर्व शिक्षण या आचरे नंबर 1 या शाळेत झाले आणि आता शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त ही या शाळेतूनच होत आहे*, याचे मला समाधान वाटते. अशा भावना व्यक्त केल्या.
मला माझ्या जीवनात असंख्य गुरुजन लाभले त्यांनी माझ्यावर संस्कार केले ते सर्व गुरुजन वंदनीय आहेत.मला माझे विद्यार्थी,शिक्षक आणि सहकाऱ्यानी तसेच अधिकारी वर्गाने खूप सहकार्य केले. सुरेश ठाकूर गुरुजी, फर्नांडिस गुरुजी,सौदागर बाई, पावसकर बाई, टिळक बाई,फणसेकर बाई, पाडावे गुरुजी हे माझे प्राथमिक शिक्षक. त्यांनी मला घडवलं.सर्व प्रकारचे ज्ञान दिले,उत्तम संस्कार रुजवले आणि माझे आई-वडिलांनी तसेच नातेवाईकांनी चांगले तेवढे घ्यावे आणि प्रामाणिकपणे वागावे, कोणाचा अपमान करू नये’ अशी शिकवण दिली असे मतव्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण आडे अमृता मांजरेकर यांनी केले.तर आभार संतोष आचरेकर व रामकृष्ण रेवडेकर यांनी केले.