खोटले येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा
श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील , मालवण तालुक्यामध्ये , कसाल पासून जवळच निसर्गरम्य श्री क्षेत्र खोटले येथे वसलेले आहे.
बहुतेक ठिकाणी स्वामी मठ किंवा स्वामी मंदिर असे बोलले जाते, पण या स्थानाला श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान अशी ओळख आहे. याला कारण म्हणजे ज्या भाविकांची नितांत श्रद्धा स्वामी महाराज यांचेप्रती आहे असेच भाविक दूरवरून येथे येत असतात
या स्थानामध्ये कोणतेही नवस न करता, केवळ श्रद्धायुक्त नामस्मरणाने भक्त संकटमुक्त होतात,भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अशी हजारो भाविकांची ठाम श्रधा आहे, त्यामुळेच श्रद्धास्थान हे नामनिधान सार्थ आहे, या इथे केवळ श्रद्धायुक्त नामस्मरण चे अनुभव कित्येक भाविकांना प्राप्त झाले आहेत. ज्यांना संतान नाही, त्यांना संतान प्राप्ती, नोकरी व्यवसाय चां लाभ, विद्यार्थी ,खेळाडू यांना नेत्रदीपक प्रगती मिळते हे सर्व स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद आहेत.
गणेश घाडीगावकर यांनी कित्येक रांजलेल्या ,गांजलेल्या कुटुंबीयांना अंधश्रद्धा मुक्त केले आहे व सेवा धर्म , चांगले विचार , एकमेकांच्या उपयोगी पडणे हीच स्वामी महाराज यांची प्रिय भक्ती आहे ही शिकवणूक दिलेली आहे.
श्री गणेश घाडीगावकर यांना 2016 मध्ये पुण्यक्षेत्र अक्कलकोट येथे मठाधिपती म्हणून बहुमान दिलेला आहे.सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांचेकडून त्यांना मठाधिपती ची दीक्षा देण्यात आलेली आहे.
श्रद्धाळू भक्तांच्या मनोकामना कुठलेही नवस न करता पूर्ण होतात हेच या स्थानाचे वैशिष्टय आहे.
या स्थानामध्ये ,परमपूज्य भालचंद्र बाबा, सद्गुरू वामनराव पै, संत नामदेव महाराज, इत्यादी संत येवून गेले आहेत. संपूर्ण भारतातून एक हजारहून अधिक साधूसंत, महामंडलेश्वर यांनी इथे स्वामी महाराज यांचे दर्शन घेतले आहे.
देवभूमी असेही वर्णन साधू संताच्या मुखातील वाणी आहे.
येथील स्वामी महाराज यांची विलोभनीय मूर्ती सद्गुरू गावडे काका यांनी स्थानापन्न केली आहे.
या इथे प्रती आत्मलिंग पादुका कायम स्वरुपी भाविकांना दर्शन देतात.
ग्रामदैवत श्री रवळनाथ, गांगेश्वर, पावनाई, काळकाई, लिंगेश्वर, दीरबाई, गीरोबा, महापुरुष यांचे कृपा आशीर्वाद या स्थानाला आहेत.
येथील पालखी उत्सव हा प्रसिद्ध असून कित्येक दूरवरून चित्ररथ, भजनी मेळे, ढोलपथक यांचा समावेश असून उत्सवाला सारा गाव स्वामि नामाने न्हाऊन जातो.
खोटले गाव दशक्रोशी मधील ही सर्व मंडळी पुण्यवान आहेत त्यांना स्वामी समर्थ महाराज यांचा सहवास लाभत आहे.
मुबई , पुणे, कोल्हापूर, बेळगांव , नाशिक इत्यादी ठिकाणावरून हजारो भाविक श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, खोटले येथे येत असतात.
या वर्षी बुधवार 10 एप्रिल 2024 रोजी *श्री स्वामी समर्थ प्रकट दींन पालखी उत्सव साजरा होणार आहे.