“कापर” असलेल्या उमेदवाराकडून लोकसभा मतदारसंघाचा विकास शक्य नाही!
किरण सामंतांच्या च्या ट्विटबाबत उदय सामतांकडून खुलासा
शिवसेनेचाच या मतदारसंघावर दावा
राणे शिवसेनेचे उमेदवार असतील असे मी केव्हाही म्हटले नाही: उदय सामंत
शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत यांनी काल ट्विट करत जी माघार घेण्याची भूमिका घेतली ती भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्रास होऊ नये या दृष्टीने घेतलेली भूमिका होती. त्यानंतर मी नागपूर मध्ये असून देखील रत्नागिरी व सिंधुदुर्ग मधील पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बोललो. 4 एप्रिल ला उद्या रत्नागिरी मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत. महायुतीत शिवसेनेला ही जागा मिळाल्यानंतर दोन ते अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महायुतीत शिवसेनेला मिळालेली जागा असून देखील या जागेसाठी कसरत करावी लागते व त्याचा त्रास एकनाथ शिंदे यांना होतो या दृष्टीने भावनिक होत किरण सामंत यांनी तो घेतलेला निर्णय होता. महायुतीत शिवसेचा हा मतदारसंघ असून पूर्वीचे खासदार आमच्या सोबत आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा आहे. संवेदनशील व भावनाप्रधान असलेलीच व्यक्ती या मतदारसंघाचा विकास करू शकते. जो कापर असतो तो त्या मतदारसंघाचा विकास करू शकत नाही. असा चिमटा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कुणाचे नाव न घेता काढला. ट्विट नंतर किरण सामंत यांची समजूत काढण्यात आली आहे. आजही शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून मी मुळीच नाराज नाही कुटुंब व पक्ष म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गातील उमेदवारी संदर्भातील शिवसेनेचा निर्णय मी घेतो. व शिवसेनेने येथे आपला दावा कायम ठेवला आहे. विरोधकांनी कितीही उलटसुलट चर्चा केल्या तरी त्याचा महायुतीवर काही परिणाम होणार नाही. सोशल मीडियावर एखादी पोस्ट आली याचा अर्थ ती पक्षाची भूमिका होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती मधील हा मतदार संघ माझ्याजवळ निरीक्षणासाठी दिला आहे. त्यामुळे ट्विट मुळे काही कुणाचा गैरसमज झाले असतील तर ते दूर करावेत असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कार्यकर्त्यांची व आमची सर्वांची भावना हा मतदारसंघ शिवसेनेजवळच राहावा अशी आहे. किरण सामंत माझी मोठे बंधू असले तरी राजकारणात अशा पद्धतीने सोशल मीडियाचा वापर होऊ नये असे देखील त्यांना मी सांगितल्याचे उदय सामंत म्हणाले. यावेळी पत्रकारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शिवसेनेतून उमेदवारी मिळेल का? असा प्रश्न करतात मंत्री उदय सामंत काहीसे गोंधळले. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोठी नेते आहेत. मी असे कुठेही म्हटलेले नाही की भाजपामधील एखादी नेता येऊन शिवसेनेतून निवडणूक लढवेल. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे सारख्या मोठ्या नेत्यावर बोलणं हे माझ्या राजकीय शिष्टाचारात बसत नाही असे देखील श्री सामंत यांनी स्पष्ट केले. जर पक्षाने तिकीट दिल तर मी निवडणूक लढवीन व निवडून देखील येईल असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. हा प्रत्येक पक्षाचा अधिकारच आहे. असे देखील सामंत यावेळी म्हणाले.
सिंधुदुर्ग /प्रतिनिधी